By  
on  

Trailer Preview: रोहित शेट्टी आणि रणवीर सिंहचा 'सिंबा' धम्माल उडवून देणार

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे सिनेमे म्हणजे अॅक्शन, ड्रामा आणि लव्हस्टोरी यांनी भरपूर आणि यातच सोने पे सुहागा म्हणजे  धम्माल मनोरंजनाची हमाखास गॅरण्टी. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातला सर्व ताण विसरायचा आणि तीन तास रोहित शेट्टीचा सिनेमा फुल ऑन एन्जॉय करायचा, हे जणू चाहत्यांसाठी समीकरणच झालंय. सिंघमध्ये अजय देवगणचा सुपरकॉप अंदाज घेऊन येणारा रोहित यावेळ रणवीर सिंहला घेऊन ही पोलिसांची आगली वेगळी गॅॆंग घेऊन धम्माल उडवून द्यायला सज्ज झला आहे.

पिपींगमूनच्या टीमला नुकतंच रेहित शेट्टीने सिंबा ट्रेलरच्या प्रायव्हेट स्क्रिनींगसाठी खास आमंत्रित केलं होतं. तेव्हा रोहित आपल्या सिनेमावर भलताच खुश दिसला आणि त्याच्या चेह-यावरचा तो समाधानाचा आनंद स्पष्ट झळकत होता.

चला तर मग जाणून घेऊयात नेमकं काय दडलंय ट्रेलरमध्ये, 

सिंबामध्ये बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहसोबत सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान नायिका म्हणून झळकणार आहे. सुपर कॉपच्या भूमिकेत रणवीर सिंह एकदम परफेक्ट दिसतोय त्याची वागण्या बोलण्याची शैली आणि संवाद खुपच छान जुळून आले आहेत.

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह हे दोघं जर कुठल्या प्रोजे्क्टसाठी एकत्र येत असतील आणि त्यात मस्ती नाही असं होऊच शकत नाही. या दोघांच्या समीकरणामुळे हा ट्रेलर सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त धमाकेदारच ठरलाय. सोनू सूदची व्यक्तिरेखा सिनेमाच्या ड्रामा आणि अॅक्शनमध्ये मजा आणते तर रणवीरची नायिका सारासोबतची केमिस्ट्री पाहून एक परिपूर्ण मनोरंजनाची मेजवानी मिळते.

सिध्दूच्या भूमिकेचं कौतुक करायलाच हवं

रोहित शेट्टीच्या गॅंगमध्ये आपला मराठमोळा एनर्जेटिक कलाकार सिध्दार्थ जाधव नेहमीच सामील असतो. सिंबामध्ये एका विशेष भूमिकेत सिध्दूची वर्णी लागलीय. ट्रेलरमध्ये सिध्दूच्या भूमिकेची एक हलकीशी झलक पाहायला मिळाली, पण त्यातही तो भाव खाऊन गेला.एका प्रामाणिक पोलिसाच्या भूमिकेत तो दिसणार असून महिला अत्याच्यारावरचा त्याचा ट्रेलरमधला एक संवाद एकदम झक्कास ठरतोय.

चाहत्यांना आत्ता फक्त ट्रेलरचीच नाही तर सिंबाच्या प्रदर्शनाची प्रचंड आतुरता लागून राहिली ाहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive