Exclusive: अक्षय कुमारचा नवा सिनेमा ‘बेल बॉटम’ कन्नड सिनेमाचा रिमेक नाही

By  
on  

अक्षय कुमार सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. अनेक सिनेमे हातात असतानाही आणखी एका बिग बजेट सिनेमांसाठी तो तयार झाला आहे. अक्षय त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये वासू भगनानींसोबत दिसणार आहे. भगनानींसोबत अक्षयच्या या नव्या सिनेमाचं नाव ‘बेलबॉटम’ असणार आहे. 'गुड न्यूज', 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बॉम्ब', 'बच्चन पांडे' या सिनेमांच्या शुटिंगनंतर अक्षय बेल बॉटमच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. 

हा सिनेमा कन्नड सिनेमाचा रिमेक असल्याचं बोललं जात होतं. पण हे सत्य नाही. हा सिनेमा पुर्णपणे ओरिजिनल कथेवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. रेट्रोची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाचं कथानक थ्रिलर असणार आहे. या सिनेमाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु असून ते या वर्षाखेरीस संपण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share