Exclusive : अजय देवगण संजय लीला भन्साळींच्या 'गंगूबाई काठियावाड़ी' मध्ये साकारणार पठाण डॉन करीम लालाची व्यक्तिरेखा

By  
on  

संजय लीला भन्साळी १९९९ साली आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' सिनेमानंतर २० वर्षांनी आपल्या आगामी सिनेमासाठी अजय देवगणला साईन करत आहेत. खूप दिवसांपासून बॉलिवूडमध्ये दोन सिनेमे चर्चेत आहेत त्यापैकी एक म्हणजे कामाठीपुरा मधील प्रसिद्ध वेश्यालयाची राणी गंगुबाईच्या जीवनावर आधारित 'गंगूबाई काठियावाड़ी' हा सिनेमा आणि दुसरा म्हणजे म्युझिकल रिव्हेंज ड्रामा असलेला  'बैजू बावरा'. बैजू बावरा मध्ये अजय देवगनला अकबराच्या पदरी असलेला तानसेनची नकारात्मक भूमिका ऑफर केली गेली आहे. 

आता अजय 'गंगूबाई काठियावाड़ी' मध्ये कोणती भूमिका करणार याची सर्वत्र चर्चा होती.पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार 'गंगूबाई काठियावाड़ी' सिनेमात अजय देवगण कुख्यात गुंड करीम लालाची भूमिका साकारणार आहे. मुंबईतील पठाण जनतेचा करीम लाला गॉडफादर होता. त्यावेळी हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार आणि करीम लाला या तीन डॉनची मुंबईवर दहशत होती. १९२० साली करीम लाला अफगाणिस्तानातून आला होता. 

करीम लालाच्या पठाण गॅंगने जुगार, दारूचे अड्डे, वसुली, अपहरण, जमिनीचे गैरव्यवहार, अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गोष्टींचा व्यापार करत होते. करीम लाला गुंड असला तरी तो हृदयाने कोमल होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. करीम लाला गंगुबाईला बहीण मानायचा. काहीशी रागीट असलेली गगणूबाई करीम लालाच्या संपर्कात अली आणि नंतर ते दोघे चांगले मित्र बनले. या सिनेमात आलिया भट्ट गंगुबाईची व्यक्तिरेखा साकारत आहे.त्यामुळे आता आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना  'गंगूबाई काठियावाड़ी' मध्ये पाहायला मिळेल. 

Recommended

Loading...
Share