By  
on  

सैफ-करिनाच्या लाडक्या तैमूरच्या वाढदिवसाची घाई, सुरु आहे सेलिब्रेशन

लहान मुलांना त्यांच्या वाढदिवसाचं खुपच अप्रुप असतं. वर्षातून एकदा हक्काने लाड करून घेण्याचा, गिफ्ट्स मिळवण्याचा हा दिवस असल्याने बच्चे कंपनी खुषीत असते. स्टारकिड्स तरी त्याला कसे अपवाद असणार! त्यातल्या त्यात वाढदिवस छोटे नवाब तैमूरचा असेल तर मग विचारायलाच नको.

नवाब सैफ अली खान, बेगम करीना कपूर आणि त्यांचे साहाबजादे तैमूर अली खान लाईमलाईटमध्ये राहण्याची संधी  अजिबात सोडत नाहीत. आता हेच पहा ना, लाडक्या तैमूरचा दुसरा वाढदिवस करीनाने अत्यंत धुमधडाक्यात साजरा करायचं ठरवलं होतं. पण सेलिब्रेशन मात्र २० तारखेला म्हणजेच ख-या वाढदिवसादिवशी न करता ७ तारखेला म्हणजे आज ठेवलंय. याला कारण म्हणजे सैफच्या डेट्स. बाबा सैफ तैमूरच्या वाढदिवसादिवशी बिझी असल्याने करीना आणि सैफने वेळेआधीच लाडक्या टीमचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय शुटिंगमधून उसंत मिळाल्यानंतर करीना आणि सैफने न्यु इयर सेलिब्रेशनसाठी परदेशी सहलीला जाण्याचा प्लॅन केला असल्याने लाडक्या ‘टिम’चा वाढदिवस वेळेआधीच साजरा करण्याचं ठरवलं आहे.

 

छोट्या नवाबाच्या बर्थ डे पार्टीला पाहुणेदेखील मोजकेच बोलवले आहेत. या पार्टीला रूही आणि यश जोहर, इनाया खेमु, लक्ष्य कपूर, कायनात संगा, निशा कौर वेबर, आदिरा चोप्रा आणि अब्राम खान हे स्टारकिड्स आमंत्रित आहेत.

याशिवाय तैमूरची भावंडं म्हणजेच किआन राज आणि समायरा कपूर ही करिष्माची मुलं याशिवाय अमृता अरोरा आणि नताशा पूनावाला या देखील टिमच्या पार्टीत मुलांसह हजेरी लावणार आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive