Exclusive: डिजिटल कंटेंटसाठी नवी कंपनी लॉंच करणार निर्माते दिनेश विजान

By  
on  

निर्माते दिनेश विजान यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यापैकी हिंदी मिडीयम, बदलापूर, स्त्री, बाला आणि लुका छुपी अशा सिनेमांचा त्यात समावेश आहे. आता सिनेमांनंतर दिनेश विजान हे डिजीटल माध्यमांत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्ह मिळालेल्या माहितीनुसार दिनेश आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपल्या कंटेटची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. 

अनेक प्रसिध्द निर्माते आज आपला कंटेट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द करण्यास उत्सुक आहेत. यामुळे सेन्सॉरच्या कात्रीची भिती निर्मात्यांना नसते. आपला कंटेट मुक्तपणे डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करतात.

दिनेश विजान यांची कंपनी मेडॉक फिल्म्स् निर्मित मिमी, रूह अफ़ज़ा, अंग्रेजी मीडियम, आणि गो गोवा गॉनचा सिक्वल हे सिनेमे  पुढील वर्षी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहेत. 
 

Recommended

Loading...
Share