सध्या अभिनेत्री राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 2'ची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या टीमने प्रोमोशनसाठीसुध्दा एक हटके मार्ग अवलंबला. राज्यातील सर्व पोलिस अधिका-यांची भेट घेण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांशीसुध्दा संवाद साधला.
पण बी टाऊनमध्ये काही दिवसांपासून राणी मुखर्जीच्या या पोलिसपटाची बॉलिवूडचा अॅक्शन मास्टर फिल्ममेकर रोहित शेट्टीच्या पोलिसपटांसोबत केली गेली. पण पिंपंगमूनला खुद्द राणी मुखर्जीनेच आपला 'मर्दानी 2' हा सिनेमा रोहितच्या पोलिसपटांपेक्षा कसा वेगळा आहे, याचं एक्सक्ल्युझिव्ह स्पष्टीकरण दिलं आहे.
राणी म्हणते, मर्दानी मधील माझी शिवानीची व्यक्तिरेखा ही अजयचा 'सिंघम', रणवीरचा 'सिम्बा', अक्षयचा 'सूर्यवंशी' आणि सलमानच्या 'चुलबुल पांडे' पेक्षा वेगळी आहे. कारण शिवानी रॉय ही एक महिला पोलिस अधिकारी आहे. 'मर्दानी' आपल्या ख-या आयुष्यातील पोलिसांना पडद्यावर साकारते. ही भूमिका रोहितच्या धम्माल अॅक्शन पोलिसपटांपेक्षा पूर्णत: वेगळी आहे. माझं ही शिवानीची व्यक्तिरेखा वास्तववादी पोलिसांना समर्पित आहे.