By  
on  

Exclusive: ‘सारे जहां से अच्छा’नंतर शाहरुख करणार 'डॉन 3'ची शुटींग

बॉलिवुड किंग शाहरुख खानच्या झिरो सिनेमाच्या प्रदर्शनानंतर लगेचच उलट-सुलट चर्चांनी जोर धरला. फॅन्सला त्याच्या या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण अखेर त्या फोल ठरल्या. इतकंच काय शाहरुखचे मागील सिनेमे आणि त्याचं यश पाहता ते आपलं स्थान निर्माण करु शकले नाहीत. पण शाहरुख निराश होऊन अजिबातच थांबला नाहीय, तर त्याने आपलं काम नेटाने  सुरुच ठेवलं आहे.

शाहरुख लवकरच आपला आगामी सिनेमा ‘सारे जहां से अच्छा’च्या शुटींगला सुरुवात करणार आहे. अंतराळवीर राकेश शर्माच्या बायोपिकची शुटींग करणार आहे.दिग्दर्शक महेश मथाई यांचा हा सिनेमा मार्चपासून फ्लोअरवर जाणार असल्याचे समजते. आत्तापर्यंत झीरोच्या प्रोमोशनमध्ये बिझी होता. पण महत्त्वाचं म्हणजे यंदा 2019 मध्ये किंग खानकडे फक्त हाच सिनेमा नाहीय, तर त्याने डॉन 3 लासुद्धा हिरवा कंदिल दाखवलाय.

शाहरुख राकेश शर्मा बायोपिकनंतर डॉन 3च्या शुटींगला सुरुवात करणार आहे. या सिनेमासह जोडलेल्या सुंत्रांनुसार, फरहान अख्तर आणि त्याची टीम गेल्या दीड वर्षापासून या स्क्रीप्टवर काम करतेय. बराच काळ स्क्रीप्टवर काम केल्यानंतर फरहानने ती लॉक केली असून त्याला विश्वास आहे की, आधीच्या दोन भागांपेक्षा हा भाग एकदम हटके आणि प्रेक्षकांना खुप आवडेल.

तसंच 2019 साली सुरु होणारी डॉन 3 ची शुटींग एका वर्षात पूर्ण होऊन हा बहुचर्चित सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive