Exclusive : थ्रिलर सिनेमात बाप-लेकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार सैफ अली खान आणि अनन्या पांडेला

By  
on  

सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. नुकताच त्याच्या 'जवानी जानेमन' सिनेमाचं बोल्ड पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीला आलं. आता त्याच्या आणखी एका सिनेमाबाबतची एक्सक्ल्युझिव्ह माहिती पिपींगमूनला मिळाली आहे. बाप-लेकीच्या नात्यावर आधारित आगामी सिनेमात अभिनेत्री अनन्या पांडेच्या वडिलांच्या भूमिकेत सैफ अली खानला पाहायला मिळणार  आहे. बाप-लेकीचं प्रभावशाली नात्यावर हा सिनेमा भाष्य करतो. 

येत्या 2020 मध्ये प्रदर्शित होणा-या सैफच्या बिग बजेट सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. अनन्या पांडे आणि सैफची प्रमुख भूमिका असलेला हा थ्रीलर सिनेमा रईस फेम दिग्दर्शक राहुल ढोलकिया दिग्दर्शित करतोय. एक्सल एन्टरटेन्मेंन्ट अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. 

 सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार, अनन्या आणि सैफने सिनेमासाठी आपल्या तारखा दिल्या आहेत. दोघंही ह्या वेगळ्या विषयावरच्या सिनेमासाठी खुपच उत्साहीसुध्दा आहे. तसंच एप्रिल 2020 मध्ये या सिनेमाच्या शूटींगला सुरुवातही होईल.

पिपींगमूनच्या सूत्रांनुसार येत्या एक दोन आठवड्यात सैफ अली खान आणि अनन्या पांडे स्टारर या आगामी सिनेमाची अधिकृत घोषणा होऊ शकते.     
 

Recommended

Loading...
Share