Exclusive: राजकुमार हिरानींच्या तीन स्क्रिप्टपैकी एकाची निवड करणार किंग खान ?

By  
on  

'झिरो'सिनेमा नंतर शाहरुख खानचा अद्याप एकही सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला नाही. शाहरुखचे चाहते त्याच्या सिनेमाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहतायत. नवीन वर्षानिमित्त तरी किंग खान आपल्या नव्या सिनेमाची काहीतरी घोषणा करेल अशी चाहत्यांना आशा होती परंतु त्याने ट्विटरवरुन फक्त सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

शाहरुख आपल्या तीन सिनेमांची घोषणा करणार अशी इंडस्ट्रीत कुणकुण लागली होती. पण अद्यापतरी याचं कुठलंच चिन्ह दिसलं नाही. मात्र पिपींगमूनला नक्की शाहरुख काय करतोय, याची कल्पना आली आहे. शाहरुख आणि प्रसिध्द फिल्ममेकर राजकुमार हिरानी हे आगामी प्रोजेक्टसाठी हातमिळवणी करतील, कारण हिरानी यांच्या 'मन्नत'च्या फे-या वाढू लागल्या आहेत. पण त्यांनी अद्याप कुठल्याच स्क्रिप्टवर शिक्कामोर्तब केलेलं नाही. सध्या ही जोडी तीन स्क्रिप्टवर काम करतेय.  एक आहे सामाजिक विषयावर बेतलेला कॉमेडी ड्रामा, दुसरा काल्पनिक क्रिकेट कथा तर तिसरा लाला अमरनाथ या ज्येष्ठ क्रिकेटरचा बायोपिक. महत्त्वाची आणखी एक माहिती अशी की, एसआरके दररोज अनेक दिग्दर्शकांची भेट घेतो आणि त्यांच्याकडून डझनभर स्क्रिप्टसुध्दा ऐकतो. त्याला काही स्क्रिप्ट आवडतात पण त्याने कुठलीच फायनल केलेली नाही. 

साऊथ फिल्मेकर अटली कुमारच्या अॅक्शन मसाला फिल्मबाबतही किंग खानची बोलणी सुरु होती. जर ही बोलणी यशस्वी ठरली तर त्याचा फ्लोअरवर जाणारा हा पहिला सिनेमा ठरेल नाहीतर राजकुमार हिरानी यांचं एकतरी प्रोजेक्ट तो फायनल करेलच असं दिसतं, तर तिसरं म्हणजे तो यशराज फिल्म्सच्या 50 व्या वर्धापनानिमित्त खास सिनेमाचा भागसुध्दा होऊ शकेल असं बोललं जात आहे. अली अब्बास जफर हा सिनेमा दिग्दर्सित करणार असून 2020मध्येच तो प्रदर्शित होईल . 

आता शाहरुख नेमकं कोणतं प्रोजेक्ट फायनल करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तूर्तास तरी आपल्याला त्याची वाट पाहावी लागेल. 

Recommended

Loading...
Share