Exclusive : 'तुंबाड' फेम राही अनिल बर्वे अॅमेझॉन प्राईमवर घेऊन येत आहेत ऐतिहासिक कॉमेडी

By  
on  

'तुंबाड' हा फॅण्टसी भयपट दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी प्रेक्षकांसमोर सादर केला आणि तो रसिकांच्या व समिक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला . ‘तुंबाड’ची कथा मूळ कोकणातल्या ‘तुंबाड’ गावातील एका वाड्याची आहे . नारायण धारपांच्या कथेवरून प्रेरणा घेत दिग्दर्शक बर्वे तसेच मितेश शहा, आदेश प्रसाद आणि आनंद गांधी या चार जणांनी ‘तुंबाड’ची पटकथा लिहिली .  आता तुंबाड फेम दिग्दर्शक  राही अनिल बर्वे लवकरच एक वेब-शोसह प्रेक्षकांसमोर येणार आहेत.  

पिपींगमूनला एक्स्क्ल्युझिव्ह मिळालेल्या माहितीनुसार, राही बर्वे  अॅमेझॉन प्राईमसाठीजो नवा सिनेमा घेऊन येत आहेत . 'तुंबाड'पेक्षा दृश्य स्वरुपात तो जरा डावा ठरेल. हा जरा विनोदी शैलीकडे झुकणारा सिनेमा असणार आहे. 'अश्वलिंग' असं या सिनेमाचं नाव असून पुरातन काळातील कामसूत्रवर आधारित  हा सिनेमा आहे. 

राही बर्वे यांच्या या पौराणिक सिनेमाच्या प्री प्रोडक्शनवर काम करत असून पुढच्या महिन्यात भारतातच  'अश्वलिंग' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात होईल. तसंच सूत्रांनुसार सिनेमाचे कलाकारसुध्दा निश्चित झाले असले तरी ते अद्याप गुलदस्त्यातच आहेत. 

बर्वे यांनी नुकतंच फिचर सिनेमा मयसभाचं शूटींग पूर्ण केलं. जावेद जाफरी आणि बालकलाकार मोहम्मद समद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच अॅमेझॉनची ही वेबसिरीज संपल्यानंतर ते जॅकी भगनानी यांच्या प्रोडक्शनसाठी एक सिनेमा दिग्दर्शित करतायत. तसंच त्यानंतर एक बिग बजेट सस्पेन्स थ्रीलरवरसुध्दा त्यांचं काम सुरु आहे. 

Recommended

Loading...
Share