Exclusive:श्रीशांतला मिळालीय मराठी सिनेमाची ऑफर

By  
on  

कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी रिएलिटी शोमध्ये चर्चेत राहिलेला एक चेहरा म्हणजे भारताचा माजी क्रिकेटर श्रीशांत. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉसच्या 12 व्या पर्वात श्रीशांतने अंतिम दोन स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान पटकावला. पण या अतीतटीच्या चुरशीत त्याला फक्त उपविजेते पदावरच समाधान मानावं लागलं.

श्रीशांतने जरी बहुचर्चित बिग बॉस 12 च्या पर्वात उपविजेतेपद पटकावलं असलं तरी त्याची प्रसिध्दी मात्र तसूभरही कमी झालेली नाही. अनेक वाद-विवादांनी त्याने हे पर्व गाजवलं. तर काही दिवसांपूर्वीच त्याच्या एका चाहत्याने या शोची विजेती दीपिका कक्करला असिड फेकण्याची धमकी दिल्याने त्याची बरीच चर्चा रंगली होती. सध्या मनोरंजन विश्वात रममाण झालेल्या श्रीशांतला जेव्हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल पिपींगमूनने त्याला बोलतं केलं, तेव्हा त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच दिला.

पिपींगमूनशी बातचीत करताना उत्साहीत होत श्रीशांत सांगतो, “ मी सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करतोय. माझा तमिळ आणि तेलुगू या भाषांमधील एक सिनेमा लवकरच येतोय. तसंच महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे एका चांगल्या मराठी सिनेमाची ऑफर आली आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांतच तुम्हाला समजेल की मी मराठी सिनेमा करतोय की नाही. तुम्हाला फक्त थोडीशी वाट पाहावी लागेल. ”

सर्वांनाच आता श्रीशांतला मराठी सिनेमाता पाहम्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Share