EXCLUSIVE : आजारी ऋषि कपूर यांना भेटण्यासाठी रणबीर कपूर आणि आलिया भट पुन्हा दिल्लीत

By  
on  

प्रसिद्ध अभिनेता ऋषि कपूर यांची रविवारी अचानक प्रकृती बिघडली. आणि म्हणूनच दिल्लीतल्या एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्यासोबत त्यांची पत्नि नीतू सिंहदेखील उपस्थित होती.  मुलगा रणबीर कपूर आणि रणबीरची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भटही यावेळी उपस्थित होते. 
मात्र ऋषि यांची प्रकृती स्थिर झाल्यामुळे रणबीर आणि आलिया दिल्लीहून निघून पुन्हा मुंबईत दाखल झाले होते. मात्र पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनूसार ऋषि कपूर यांना न्यूमोनिया झाल्याचं समोर आलं आहे. ऋषि कपूर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचही समोर आलं आहे. आणि म्हणूनच रणबीर कपूर आणि आलिया पुन्हा दिल्लीला रवाना झाल्याची माहिती पिपींगमूनला मिळाली आहे. 


आलिया भट जिने नुकतच संजय लीला भंसाळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचं चित्रीकरण संपवलं आहे. तिने लगेचच रणबीरसोबत ऋषि यांना पाहण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. जेव्हा ऋषि कपूर कर्करोगाने ग्रस्त होते तेव्हाही आलिया रणबीरसोबत त्यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली होती. 
ऋषि आणि नितू कपूर नवी दिल्लीत एका फॅमिली सोहळ्यासाठी गेले होते. तिथेच ऋषि आजारी पडले आणि त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ऋषि कपूर यांना इन्फेक्शन झाल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चुलत भाऊ अरमान जैनच्या मेहंदी सोहळ्यालाही रणबीर-आलिया परफॉर्म करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ऋषि यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तिथे जाणही टाळलं होतं.


पीटीआयच्या वृत्तानुसार ऋषि म्हटले होते की, मला इन्फेक्शन झालं आहे ज्यावर उपचार सुरु आहेत. चिंता करण्याचं कारण नाही. मला वाटतय की कदाचित प्रदुषणामुळे मला असं झालं असावं.”
 

Recommended

Loading...
Share