Exclusive: वरुण धवन आणि नताशा दलालचं यंदा कर्तव्य ! या ठिकाणी घेणार सात फेरे

By  
on  

सिनेसृष्टीत सध्या लग्नसराईचे वेध लागले आहेत. सेलिब्रिटींनासुध्दा लग्बंधनात अडकण्याची घाई झाली आहे. बॉलिवुडमधील क्युट कपल म्हणून ओळखलं जाणारं अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालपणीची मैत्रिण डिझाईनर नताशा दलाल यांच्यासुध्दा लग्नाचे वेध कुटुंबियांना आणि चाहत्यांना लागले आहेत.मध्यंतरी वरुणने आपलं लग्न सिनेमांसाठी पुढे ढकलल्याच्या वावड्या उठल्या. पण त्या केवळ अफवाच होत्या. आकाश आणि श्लोका अंबानी यांच्या ग्रॅण्ड लग्नसोहळ्यात जेव्हा नताशा ही वरुणच्या आई-वडीलांसह पोहचली तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झालं.

आता पिपींगमूनच्या हाती आलेल्या एक्सक्ल्युझिव्ह वुत्तानुसार, वरुण आणि नताशा ही जोडी यंदाच्या मे महिन्यात थायलंडमध्ये लग्नगाठ बांधतील.  डेस्टिनेशन वेडींगसाठी रोमॅंण्टीक थीमनुसार वरुण आपल्या लग्नासाठी खास अरेंजमेंट करतोय. थायलंडच्या जे डब्ल्यू मॅरिएट खाओ लेक रिसॉर्ट आणि स्पामध्ये हा लग्नसोहळा पार पडेल. 

पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लग्नसोहळा मेमध्ये आणि डेस्टिनेशन वेडींग मिहणून  थायलंडमध्येच पार पडेल. नयनरम्य अशा सूर्यास्ताच्या साक्षीने थाडलंडमध्ये वरुण-नताशा आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणभाका घेतील. सविस्तर माहिती लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू. तोपर्यंत वरुण-नताशाला नव्या आय़ुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा!

 

Recommended

Loading...
Share