EXCLUSIVE: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताला रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ सिनेमा

By  
on  

फिल्ममेकर करण जौहर, रोहीत शेट्टी आणि बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार ही तीन नावे आगामी येणाऱ्या एका मोठ्या सिनेमामागे जोडली गेली आहे. आणि याच त्रिकुटाने आता ‘सुर्यवंशी’ या त्यांच्या आगामी सिनेमाची रिलीज तारीख बदलली आहे. या सिनेमाच्या रिलीजसाठी त्यांनी एक शुभ दिवस निवडला आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार करण, रोहीत आणि अक्षय यांनी एकमताने ‘सुर्यवंशी’ सिनेमाची रिलीज तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा याचवर्षी 27 मार्चला रिलीज होणार होता, मात्र आता हा सिनेमा येत्या 25 मार्चला रिलीज करण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला आहे. 25 मार्च या तारखेला गुढीपाडवा असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. 


महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी नव वर्षाचं स्वागत केलं जातं, आणि हिंदू कॅलेंडरनुसार हा दिवस शुभ मानला जातो. सुत्रांनी पिपींगमूनला अशी माहिती दिली आहे की, “दुसऱ्या कोणत्या सणाला ‘सुर्यवंशी’ सिनेमा रिलीज करण्याची गरज सध्या वाटत नाही, शिवाय रोहीत शेट्टी यांनी ईदची रिलीज तारीख सलमानला ‘इन्शाहअल्लाह’ सिनेमासाठी दिली होती, जो सिनेमा सलमान खान हा संजय लीला भंसाळी यांच्यासोबत करणार होता. मात्र  ‘सुर्यवंशी’ सिनेमा गुढीपाडव्याच्या दोन दिवसांनी येत असल्याचं जेव्हा रोहीत शेट्टी आणि टीमला जाणवलं, तेव्हा त्यांनी रिलीज तारीख बदलण्याचा निर्णय घेतला.”


तेव्हा ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा येत्या गुढीपाडव्याला म्हणजेच,  येत्या 25 मार्चला रिलीज होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते खासकरुन महाराष्ट्रात उत्सवाचं वातावरण असतं. या सिनेमाच्या रिलीजच्या आदल्या दिवशी म्हणजेच 24 मार्चच्या रात्रीच या सिनेमाचं ओपनिंग सुरु होणार असल्याची माहिती पिपींगमूनला मिळाली आहे. तेव्हा खिलाडी अक्षय कुमारचे चाहते एडवान्स बुकिंगसाठी गर्दी करतील एवढं नक्की. 

 

    
   

Recommended

Loading...
Share