Exclusive: वरुण धवन कॉमेडी सिनेमा ‘मसखरा’साठी राज शांडिल्यसोबत दिसणार?

By  
on  

ड्रीम गर्ल हा सिनेमा दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक राज शांडिल्य आता आणखी एका स्क्रिप्ट वर काम करत आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार राज मसखरा नावाच्या कॉमेडी सिनेमावर काम करत आहेत. एका स्टॅण्ड अप कॉमेडियनच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते. राजने मागील महिन्यात वरुणला ही स्क्रिप्ट ऐकवली होती. वरुणला ती आवडली देखील. 

सुत्रांच्या मते, वरुण एक एंटरटेनर आहे. त्यामुळे वरुण हा मसखरासाठी योग्य निवड आहे असं राजला वाटतं. याशिवाय राज मेल सरोगसीशी रिलेट आणखी एक सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याचं समोर आलं आहे. एकता कपूर या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहे. वरुण सध्या डेव्हिड धवनच्या कुली नं. 1 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

Recommended

Loading...
Share