सुपरस्टार अक्षय कुमारच्या आगामी ‘लक्ष्मी बाँब’ रिलीजला आता काहीच महिने बाकी आहेत. या सिनेमात अक्षय कुमार एक ट्रान्सजेंडरच्या (तृतीयपंथीयाच्या) भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा आतापासूनच विविध सेक्शुअली ओरिएंटेड कम्युनिटीमधील लोकांचं मन जिंकताना दिसत आहे.
लक्ष्मी बाँबचे रायटर राघव लाँरेंन्स यांनी आज अभिमानाने ही बाब शेअर केली आहे.
अक्षय जवळपास 1.5 कोटी रुपये देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर होम निर्माण करण्यासाठी दान केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राघव यापुर्वीच एका ट्रस्टच्या माध्यमातून मुलांच्या शैक्षणिक आणि रिसर्चमध्ये मदतीसाठी कार्यरत आहेत. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘आम्ही आमच्या 15 व्या वर्षी ट्रान्सजेंडर्सना आसरा देण्यासाठी नवीन प्रोजेक्ट सुरु करणार होतो.’
या होमसाठी लॉरेन्स यांच्याकडे पहिल्यापासून जमीन होती. यावर ते म्हणतात, ‘लक्ष्मी बाँबच्या शुट दरम्यान अक्षय या ट्रस्टच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने ट्रान्सजेंडर होम बनवण्याच्या विषयी बोलला होता. या विषयी चर्चा होताच. त्याने कोणताही विचार न करता 1.5 कोटी दान करण्याचं ठरवलं.
यावेळी भावनिक होत राघव म्हणतात, मी मदत करणा-या प्रत्येकाला देवाच्या रुपात मानतो. आता अक्षयसर आमच्यासाठी देव आहेत. तामिळनाडूमध्ये बनत असलेल्या या होममध्ये ट्रान्सजेंडरना आसरा, जेवण आणि वैद्यकिय सुविधा मिळतील. या बातमीने ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.