शाहरुखचा शेवटचा सिनेमा ‘झिरो’ येऊन दोन वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. त्याने अजून पुढचा कोणता सिनेमा करायचं हे ठरवलेलं देखील नाही. पण त्याची निर्मिती संस्था रेड चिलीज एंटरटेनमेंटने मात्र सिनेमा निर्मितीचा धडाका लावला आहे. अलीकडेच त्याची संजय मिश्रा मुख्य भूमिकेत असलेला ‘कामयाब’ सिनेमाची चर्चा आहे. 80 च्या दशकातील एक्स्ट्रा अभिनेत्याच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. याशिवाय अभिषेक बच्चन आणि चित्रांगदा सिंग स्टारर ‘बॉब बिस्वास’ ही रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती आहे.
आताच पीपिंगमून 2020ला मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख आता एका क्राईम थ्रिलर सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा सत्यघटनेवर आधरित असेल. या सिनेमात अर्जुन पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा मुझ्झफरपुर मधील एका आश्रमातील सेक्स स्कॅंडलवर आधारित असणार आहे. या आश्रमातील 42 महिलांमधील 7 ते 17 वयोगटातील 34 महिलांवर लैंगिक अत्याचार झाले होते. या प्रकरणी 19 लोकांवर आरोपपत्र ठेवण्यात आलं आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याला देखील अटक करण्यात आली आहे. अल्ट-बालाजीची ‘बोस: डेड ऑर अलाईव्ह’ ही वेबसिरीचं दिग्दर्शन केलेला पुलकित या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाच्या प्री प्रोडक्शनलाही सुरुवात झाली आहे. याशिवाय अर्जुनची संदीप आणि पिंकी फरार हा सिनेमाही रिलीज होणार आहे. याशिवाय रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या क्लास ऑफ 83 आणि बेताल या दोन वेबसिरीजही लवकरच रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत.