सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अनेक सेलिब्रिटी जोड्या लग्नबंधनात अडकत आहेत. बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर आणि लाखो तरुणींच्या हदयाची धडकन वरुण धवनच्या लग्नाचे आाता सर्वांना वेध लागले आहेत. बॉलिवुडमधील क्युट कपल म्हणून ओळखलं जाणारं अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालपणीची मैत्रिण डिझाईनर नताशा दलाल यांच्यासुध्दा लग्नाचे वेध कुटुंबियांना आणि चाहत्यांना लागले आहेत.
पिपींगमूनने यापूर्वी तुम्हाला एक्सक्ल्युझिव्ह सांगितल्याप्रमाणे वरुण आणि नताशा ही जोडी यंदाच्या मे महिन्यात थायलंडमध्ये लग्नगाठ बांधणार होते. डेस्टिनेशन वेडींगसाठी रोमॅंण्टीक थीमनुसार वरुण आपल्या लग्नासाठी खास अरेंजमेंट करतोय. थायलंडच्या जे डब्ल्यू मॅरिएट खाओ लेक रिसॉर्ट आणि स्पामध्ये हा शानदार लग्नसोहळा पार पडणार होता, पण आता 'करोना'चं सावट घोंघावत असल्याने या प्लॅनवर पाणी फेरले आहे. आता ही जोडी मुंबईतच लग्नबंधनात अडकणार आहे.
आकाश आणि श्लोका अंबानी यांच्या ग्रॅण्ड लग्नसोहळ्यात जेव्हा नताशा ही वरुणच्या आई-वडीलांसह पोहचली तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झालं होतं.