By  
on  

Exclusive: आयुष्मानच्या पावलावर पाऊल ठेवतोय राजकुमार राव, वाचा सविस्तर

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा अभिनेता राजकुमार राव सध्या अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पावलावर पाऊल ठेवताना पाहायला मिळतोय. आयुष्मान आणि राजकुमारने यापूर्वी 'बरेली की बर्फी'मध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे ह्या सहकलाकारांचं सिनेमानिवडीबाबतसुध्दा एकमतच पाहायला मिळतंय. 

पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार, राजकुमारने एक असा सिनेमा साईन केलाय जो, आयुष्मान खुरानाचा 2017 चा सुपरहिट सिनेमा शुभमंगल सावधान सारख्या विषयावर बेतला आहे. अद्याप या सिनेमाचं शिर्षक ठरलेलं नाही. शुभमंगल सावधान हा एक कॉमेडी ड्रामा असलेला सिनेमा होता, ज्यात आयुष्मानने एका यौन पिडीत  म्हणजेच लेंगिक शोषण झालेल्या तरुणाची व्यकितिरेखा साकारली होती. गंभीर विषयाचं हलकं-फुलकं सादरीकरण पाहायला मिळालं. सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार राजकुमारचा हा सिनेमासुध्दा कौटुंबिक कॉमेडी ड्रामा असेल. 

राजकुमार रावच्या या आगामी सिनेमाचं शूटींग पुढच्या महिन्यात मध्यप्रदेशमध्ये सुरु होईल. या सिनेमाचं दिग्दर्शन अमित राय करतोय. यापूर्वी अमितने  'आगरा का डाबरा' , 'रोड टू संगम' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ह्या सिनेमाची अश्विन वर्दे यांचा नवा बॅनरर Wakaoo Films द्वारे निर्मिती होईल. 

राजकुमारचा यापूर्वी  'मेड इन चाइना' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ह्यात राजकुमारने गुजराती बिझनेस मॅनची भूमिका साकारली होती. तर त्यापूर्वी त्याने 'स्त्री' सिनेमातून धम्माल उडवून दिली होती. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive