इरफान खानचा अंग्रेजी मिडियम सिनेमाची लोक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात राधिका मदान त्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमा काहीच दिवसात रिलीज होणार आहे. यादरम्यान राधिका आणि दीपक डोबरियाल यांनी पीपिंगमूनशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली.
इरफानच्या कमिटमेंटबाबत दीपक म्हणतात, शुटिंग दरम्यान त्यांचा उत्साह अधिक होता. त्यांची तब्ब्येत खराब आहे असं वाटतही नव्हतं. त्यांच्या आजारपणाचा बाऊ त्यांनी कधीही केला नाही. सिनेमाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांनी तितकाच उत्साह दाखवला.
दीपक यांना सहमती दर्शवत राधिका म्हणते, ‘इरफान यांच्यामुळे सेटवरचा माहोल सकारात्मक होता. त्यांच्यातील आजारसोबतच्या संघर्षाचा आम्हाला पत्ताही लागू दिला नाही. केवळ दिग्दर्शकांना माहिती होतं ते कोणत्या परिस्थितीमधून जात आहेत. इरफान सरांना त्रास होतोय असं थोडं जरी जाणवलं तरी आम्ही त्यांना त्रास न देता पॅक अप करायचो.’ या सिनेमात इरफान सोबत करीना, दीपक डोब्रियाल, डिपल कपाडिया, रणवीर शौरी आणि राधिका मदान आहे. ‘अंग्रेजी Medium’ हा सिनेमा 13 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.