अंंतराळवीर राकेश शर्माच्या जीवनपटाची मागील महिन्यात बरीच चर्चा सुरु होती. बॉलिवुड किंग शाहरुख खान यात राकेश शर्माची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार होता. पण मागच्याच आठवड्यात त्याने हा जीवनपट नाकारल्याच्या ब-याच चर्चा रंगल्या होत्या. पण अद्याप हे वृत्त अधिकृत नव्हते.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने या सिनेमासाठी शाहरुखचं नाव सुचवलं होतं. आमिरला इतर वर्क कमिटमेंट्समुळे या सिनेमासाठी त्याच्याकडे तारख नव्हत्या. त्याला आपल्या महाभारतवर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करायचं होतं. शाहरुखने या सिनेमाला तेव्हा होकार दिला होता. पण आता त्याने या सिनेमासाठी नकार कळवल्याचं समजतंय.
शाहरुख हा सिनेमा करतोय किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार एसआरके आणखी एक अंतराळावर आधारित सिनेमा करण्याच्या मनस्थितीत नाही. अंजुम राजाबली यांनी या बायोपिकची कथा लिहली असून रॉनी स्क्रूवाला आणि सिध्दार्थ रॉय कपूर याची निर्मिती करत आहेत. महेश मथाई सिनेमाचे या दिग्दर्शन करणार असून सिनेमाचे नाव ‘सेल्यूट’ ठेवण्यात येणार होते, त्यानंतर त्याचे ‘नाव सारे जहॉं से अच्छा’ करण्यात आले.
जर शाहरुखने खरंच हा सिनेमा सोडला असेल तर आता त्याच्या जागी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.