EXCLUSIVE : दिनेश विजनच्या आगामी ड्रामेडी सिनेमात अभिषेक बच्चन आणि यामी गौतम करणार रोमान्स 

By  
on  

2018मध्ये आलेल्या अनुराग कश्यपच्या ‘मनमर्झीया’ या सिनेमातून अभिनेता अभिषेक बच्चनचा कमबॅक झाला होता. मात्र त्यानंतर न थांबता अभिषेक बच्चनने एका मागोमाग एक तीन प्रोजेक्टची शुटींग केलं. आणि अभिषेकचं हेच काम यावर्षी भेटीला येत आहे. सध्या अभिषेक बच्चन बॉब बिसवासचं चित्रीकरण करत आहे, जे सुजॉय घोषच्या ‘कहानी’ सिनेमातील फिक्शनल कॅरेक्टर आहे. या सिनेमाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली होत आहे. आणि हेच सुरु असताना अभिषेक बच्चनने आणखी एक सिनेमा करत असल्याचं समोर आलं आहे. 


पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक बच्चन हा दिनेश विजनच्या निर्मिती अंतर्गत होत असलेल्या सिनेमात काम करत आहे. या सिनेमाविषयीची आणखी माहिती अद्याप समोर आलेली नाही. या सिनेमात अभिनेत्री यामी गौतम अभिषेकसोबत झळकणार आहे. 2015मध्ये आलेल्या ‘बदलापुर’ या सिनेमात यामीने दिनेश विजनसोबत काम केलं होतं. आणि त्यानंतर मागील वर्षी आलेला ‘बाला’ हा सिनेमाही केला होता. दिनेश विजनसोबत या सिनेमांमध्ये काम केल्यानंतर यामीने या सिनेमासाठी लगेच होकार दिला आहे. 

2017 मध्ये आलेल्या ‘सरकार’ या सिनेमात यामीने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. आणि आता ज्युनियर बच्चनसोबत काम करण्यासाठीही ती उत्सुक आहे. अद्याप या सिनेमाचं टायटल समोर आलेलं नसून हा सिनेमा तुषार जलोट दिग्दर्शित करणार आहे. तुषार गेली 16 वर्षे जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. त्याने फिल्ममेकर संजय लीला भंसाळी आणि अनुराग बासू यांच्यासोबतही कामं केली आहेत. मात्र या आगामी ड्रामेडी सिनेमातून तुषार त्याचं दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. याचवर्षी जूनमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण होणार आहे. शिवाय आगामी काळात अभिषेक बच्चन हा अनुराग बासूच्या ‘लुडो’, कुकी गुलाटीच्या ‘द बिग बुल’ या सिनेमांमध्येही झळकेल. याचवर्षी अमॅझॉन प्राईमच्या ‘Breathe’ च्या सिझन-2 मध्येही अभिषेक दिसणार आहे. तर यामी गौतम ही ‘गिनी वेड्स सनी’ या सिनेमात विक्रांत मेसीसोबत दिसेल.

 

Recommended

Loading...
Share