आम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात कतरिना कैफ ही शाहरुख खान आणि आनंद एल राय यांच्या एक्शन-कॉमेडी सिनेमात झळकणार असं सांगीतलं होतं. आता सहा महिन्यानंतर पिपींगमूनला अशी माहिती मिळतेय की तो सिनेमा आता होणार नाही. या सिनेमात कतरिना कैफ महिला पोलिस अधिकारीच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता होती. ज्यात ती पहिल्यांदा पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार होती.
या प्रोजेक्टशी संबंधीत असलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, “शाहरुख आणि आनंद एल राय यांच्या झिरो सिनेमाच्या अपयशानंतर, त्यांनी साऊथ कोरियन सिनेमा मिस एन्ड मिसेस कॉप्सची हिंदी रिमेक करण्याचं ठरवलं होतं. आणि त्यांना कतरिना कैफ आणि विद्या बालन या महिला पोलिस अधिकारीच्या भूमिकेत पाहिजे होत्या. आणि दोघींनी यासाठी होकार दिला होता. मात्र यानंतर या प्रोजेक्टचं काम पुढे सरकलं नाही. मात्र सिनेमाचे मेकर्स हे भारतीय प्रेक्षकांसाठी हे जुळवू शकले नाही. शिवाय सिनेमाची कथा ही दोन्ही अभिनेत्रींच्या भूमिकांना न्याय देणारी नव्हीत. त्यामुळे शाहरुख आणि आनंद यांनी एकत्र मिळून सध्या हा प्रोजेक्ट बाजूला ठेवून दिला.” आनंद यांचा असिस्टंट अनिरुद्ध जो त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कित्येक वर्षांपासून काम करतोय तो या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार होता. तो आता सध्या त्याच्या दिग्दर्शनासाठी वेगळ्या विषयाच्या शोधात आहे. तर विद्या बालन नुकतच रवी उदयवारच्या शेरनी सिनेमासाठी चित्रीकरण सुरु केलेलं होतं. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव थांबल्यावर पुन्हा याचं चित्रीकरण संपवण्यात येईल.
मात्र या थांबलेल्या प्रोजेक्टमुळे कतरिना कैफला काही फरक पडलेला नाही. कतरिनाने एक्सेल एन्टरटेन्मेंटच्या अंतर्गत फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीचा सुपरनॅचरल कॉमेडी सिनेमा साईन केलेला आहे. यात ती सिद्धांत चर्तुवेदी आणि इशान खट्टरसोबत झळकणार आहे. ज्याचं दिग्दर्शन करत आहेत मिर्झापुर फेम गुरमीत सिंह. सध्या या सिनेमाचं नाव ‘फोन भूत’ असं ठेवण्यात आलयं. शिवाय कतरिनाने तिच्या तारखा या सलमान खानच्या ‘टायगर-3’ सिनेमासाठीही दिल्या आहेत. ज्यात ती पुन्हा एकदा झोयाच्या भूमिकेत दिसेल. शिवाय पुन्हा एकदा अली अब्बास जफरसोबत बिग स्केल सुपरहिरो फिल्मही ती करणार असल्याचं बोललं जातय.