करोनामुळे सगळा देश लॉकडाऊन आहे. अशा वेळी घरात बसून बोर होऊ नये यासाठी दुरदर्शनवरील अनेक जुन्या मालिका पुन्हा सुरु होत आहेत. रामायण आणि महाभारतसोबतच ब्योमकेश बक्शी, शक्तिमान, सर्कस, बुनियाद , श्रीमान श्रीमती या मालिकाही सुरु झालेल्या आहेत.
यासोबतच आणखी एक मालिका सुरु आहे ती म्हणजे ‘देख भाई देख’. 1 एप्रिलपासून संध्याकाळी सहा वाजता हा शो प्रसारित होताना दिसत आहे.
याच दरम्यान पीपिंगमूनने या मालिकेतील मुख्य कलाकार शेखर सुमन यांच्याशी बातचीत केली. शेखर म्हणतात, ‘ मला खुप आनंद होत आहे. ज्यावेळी हा शो संपला त्यावेळी लोक मला या शोबाबत सतत विचारलं जायचं. आता शो प्रसारित होत आहे त्यामुळे नवीन आणि जुन्या दोन्ही पिढ्यांना त्याचा आनंद घेता येईल. हा शो सुरु झाला तेव्हा माझं वय 30 होतं. जया बच्चन या शोची निर्मिती करत होत्या.
त्यावेळी मी नकार देऊ शकलो नाही. या शो ने जणू एका विझणा-या दिव्याला पुन्हा जीवन दिलं. नवीन पिढीही याशो सोबत जोडली जाईल. हा शो त्याच्यासोबत सकारात्मकता घेऊन आला आहे. या शोसोबत मी भावनिकरित्याजोडलो गेलो आहे. पण अभिजातता कायम रहात असते.’