‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे जितेंद्र कुमार. या सिनेमातील त्याच्या अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी जितेंद्र कुमार ‘पंचायत’ नावाच्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी पीपिंगमूनशी एक्सक्लुसिव्ह गप्पा मारताना जितेंद्रने अनेक बाबी स्पष्ट केल्या.
तो म्हणतो, ‘ माझ्या भूमिकांच्या निवडीमुळे मला वेबसिरीजचा आमीर खान म्हटलं जातं. खरं तर अशी तुलना होणं हीच माझ्यासाठी खुप मोठी बाब आहे. खरं तर सामाजिक विषयांवर बेतलेल्या प्रोजेक्टसचा भाग होणं हे माझ्या नशिबाचा भाग असावा खरंतर. .पण माझ्या कामाचं कौतुक होतं ही बाब प्रेरणादायी आहे.
पंचायतमधील व्यक्तिरेखेबाबत बोलायचं झालं तर माझ्या स्वभावापेक्षा पंचायतमधील अभिषेक त्रिपाठीची व्यक्तिरेखा खुपच वेगळी आहे. मी पॅशनेट आहे. मला सतत पुढे जायला आवडतं. अभिषेकचा स्वभाव याच्या उलट आहे. त्याला चाकोरीबाहेर जायला अजिबात आवडत नाही. पण दोघांचा स्वभाव अंतर्मुख आहे हे साम्य देखील आहे.
नीना गुप्तांसोबत काम करण्याचा अनुभवही खास होता. कारण पंचायतचं शुटिंग आधी संपलं. त्यानंतर ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चं शुटिंग संपलं. पण त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खरच सकारात्मक होता.