By  
on  

Exclusive: आमच्या हातात सध्या केवळ प्रतिक्षा करणं इतकंच आहे: जॅकी भगनानी

करोनाचा प्रभाव सर्वत्र प्रकर्षाने जाणवत आहे. सिनेसृष्टी करोनाच्या प्रभावामुळे जवळपास ठप्प झाल्यासारखीच आहे. बॉलिवूडच्या मोठ्या सिनेमांची रिलीज डेटही पुढे गेली आहे. सुर्यवंशी आणि 83 या सिनेमांची रिलीज डेटही पुढे गेली आहे. आता डेव्हिड धवन यांच्या कुली नं.1 च्या रिमेकची डेटही पुढे गेली आहे. वरुण धवन, सारा अली खान स्टारर हा सिनेमा 1 मे 20202ला रिलीज होणार होता. पण देशभरातील लॉकडाऊनची परिस्थिती पाहता मुळ तारखेला हा सिनेमा रिजीज होण्याची शक्यता धुसर झाली आहे. 

 

सिनेमाचे निर्माते जॅकी भगनानी यांनी पीपिंगमूनशी एक्सक्लुसिव्हली बोलताना सांगितलं की हा सिनेमा लॉकडाऊन संपल्यावरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जॅकी म्हणतो, ‘ आम्ही 15 एप्रिलला लॉकडाऊन संपण्याची वाट पहात आहोत. सध्या तरी वाट पाहाणंच आमच्या हातात आहे. या सिनेमाचं रिलीज कदाचित जून किंवा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive