By  
on  

Exclusive : 'क्रिमीनल जस्टीस' वेबसिरीजच्या दुस-या सीझनमध्ये किर्ती कुल्हारी प्रमुख भूमिकेत

किर्ती कुल्हारी ह्या अभिनेत्रीने फार कमी कालावधीत वेबविश्वात आपली ओळख निर्माण केली. इतकंच नाही तर उरी, मिशन मंगलसारख्या सिनेमातूनही ती विशेष भूमिकेत पाहायला मिळाली. फोर मोअर शॉट्स या अॅमेझॉन प्राईमच्या फोर मोअर शॉट्स प्लि्जच्या सेकंड सीझनमध्ये ती एका स्वतंत्र सिंगल मदरच्या भूमिकेत झळकतेय. पण पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार किर्तीने आणखी एक वेबसिरीज साईन केली  आहे. डिस्नी-हॉटस्टारच्या  क्रिमीनल जस्टीसच्या दुस-या भागात किर्ती प्रमुख भूमिकेत झळकतेय. 

मागच्या वर्षी रसिकांना खिळवून ठेवणारी व समिक्षकांच्या पसंतीची पावती मिळालेली  क्रिमीनल जस्टीस ही वेबसिरीज या वेळेसही गूढ, रोमांचक नाट्यासह रसिकांच्या भेटीस दुस-या सीझनसह परतते आहे. बीबीसी स्टुडिओज इंडियाने याची निर्मिती केली आहे. हा सेकंड सीझन महिलेला केंद्रस्थानी ठेवून कथानक फिरणार आहे. पहिल्या सीझन विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत होता. 

तसंच या वेबसिरीजच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, किर्ती प्रमुख भूमिकेत तर पहिल्या भागातील पंकज त्रिपाठी, अनुप्रिया गोएंका,मिता वशिष्ठ हे कलाकार कायम असतील. तसंच अर्जुन मुखर्जी व रोहन सिप्पी याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतील. 

क्रिमीनल जस्टीस सीझन २ पूर्णत्वास आलेलं आहे, फक्त देसावर उध्दभवलेलं करोनारुपी संकट टळून लॉकडाऊन संपून जेव्हा सर्व पूर्वपदावर येईल तेव्हा या वेबसिरीजचं उरलेलं काम पूर्ण होईल व ती वेबसीरिज रसिकांच्या भेटीला येईल 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive