डिस्ने- हॉटस्टारची सायन्स फिक्शन कॉमेडी सिरीजमध्ये राधिका आपटे आणि विजय वर्मा यांची वर्णी लागली आहे. दोन्ही कलाकार बॉलिवूडमध्ये स्वत:चं खास स्थान राखून आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार मध्ये आनंद गांधीच्या या सिरीजमध्ये राधिका आणि विजय यांच्या वेगवेगळ्या भुमिका आहेत. आनंद ने नॅशनल अॅवॉर्ड विनिंग फिल्म Ship of Theseus (2013) चं दिग्दर्शन केलं आहे. काजोल ची हेलीकॉप्टर इला साठी पटकथा लिहिली आहे.
विजय शक्यतो नकारात्मक भूमिकेत दिसतात पण यात ते पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. राधिका पण एका हटके भूमिकेत दिसणार आहे. आनंद गेली तीन वर्षं याबाबत लिहित आहेत. ते पहिल्यांदा या पटकथेवर इंग्लिश सिनेमा लिहिणार होते. पण विचार बदलून त्यांनी हिंदी सिरीज बनवली आहे. फेब्रुवारीमध्ये या सिरीजचं शुटिंग सुरु होणार होतं. पण लॉकडाऊनमुळे ती थांबली आहे.
गली बॉयमधील विजय वर्मा यांच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. याशिवाय ते टाइगर श्रॉफ च्या 'बागी 3', इम्तियाज अली च्या 'शी' आणि करण जोहरच्या घोस्ट स्टोरीजमध्ये दिसले होते. यशिवाय ते मीरा नायरच्या 'अ सूटेबल बॉय' मध्ये दिसणार आहेत. तर ते राधिका आपटे नवाज़ुद्दीन सिद्दीकी सोबत 'रात अकेली है मध्ये दिसणार आहे.