सलमान खान हा इंडस्ट्रीतला सर्वांचा गुरु समजला जातो. तसंच अनेकांच्या मदतीसाठी किंवा चांगल्या कामासाठी तो नेहमीच पुढाकार घेतो. हा बॉलिवूड भाई सतीश केशिक दिग्दर्शित ‘कागज ‘ह्या सिनेमाची निर्मिती व प्रस्तुती दोन्ही करतोय हे तुम्हाला माहितच आहे. पण सलमान इतक्यावरच थांबला नसून सलमानचा स्पेशल ट्च ह्या सिनेमाला लाभला आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, भाईजान ‘कागज’ या सिनेमासाठी चक्क वॉईसओव्हर करतोय. चतुरस्त्र अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा पहिला सोलो सिनेमा असणार आहे.
‘कागज’ सिनेमाच्या सुरुवातील सिनेमाच्या कथेची ओळख प्रेक्षकांना ह्या पुढील कवितेच्या माध्यमातून सलमान करुन दोणार असल्याचं वृत्त पिपींगमूनला मिळालं आहे. ही कविता दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी स्वत: लिहली आहे. एका डॉक्युमेंट भोवती सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. एक कागद आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न सिनेमात आहे.
''कुछ नहीं है मगर है सब कुछ भी
क्या अज़ब चीज है ये कागज भी
बारीशों में है नांव कागज की
सर्दियों में है अलाव कागज की
आसमान में हैं पतंग कागज की
सारी दुनिया में है जंग कागज की...”
‘कागज’ची शूटींग पू्र्ण झाली असून मेमध्ये तो प्रदर्शित होणार होता. परंतु आता करोना व्हायरसमुळे त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत बोलताना सतीश कौशिक म्हणाले,” सध्या तरी मी याबाबत काही ठोस सांगू शकत नसलो. तरी छोट्या सिनेमांना चांगली तारीख मिळणं थोडं मुश्कील असतं, परंतु सलमानमुळे माझ्यावर ती वेळ येणार नाही.”