By  
on  

Exclusive: संजय लीला भन्साळींच्या ‘ट्युसडे आणि फ्रायडे’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

आमच्याकडे असलेल्या एका बातमीने तुमचा लॉकडाऊनमधील संडे चांगला जाईल. संजय लीला भन्साळींनी त्यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर एक्सक्लुसिव्हली आमच्यासोबत शेअर केलं आहे. ट्युसडे फ्रायडे असं त्यांच्या नवीन सिनेमाचं नाव आहे. यामध्ये अभिनेत्री पुनम धिल्लों आणि अशोक ठाकेरिया यांचा मुलगा अनमोल ठाकेरिया आणि झटलेका मल्होत्रा हे पदार्पण करणार आहेत. झटलेकाने मिस इंटरनॅशनल 2014मध्ये सहभाग नोंदवला होता. 

इतर निर्मात्यांनी करोनासाथी मुळे त्यांचे सिनेमे होल्डवर ठेवले असले तरी भन्साळी यांची मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती आहे. या सिनेमांची कथा अशा जोडप्यावर बेतली कि जे एकमेकांना केवळ मंगळवार आणि शुक्रवारीच भेटून वेळ देऊ शकतात. बाकीचे इतर दिवस ते इतरांना डेट करण्यासाठी मोकळे असतात.

अनमोल यात लेखकाच्या भुमिकेत दिसणार आहे. तर झटलेका यात एंटरटेनमेंट लॉयरच्या भूमिकेत दिसणार आहे. तनवीर सिंग या सिनेमातून दिग्दर्शकीय डेब्यु करणार आहे. ट्युसडे आणि फ्रायडे हा भन्साळी यांच्या यापुर्वीच्या सिनेमांपेक्षा वेगळा असणार आहे. हा एक कलरफुल रॉमकॉम सिनेमा असणार आहे. त्यामुळे सध्याच्या नैराश्यपुर्ण वातावरणात हा सिनेमा हलकाफुलका आनंद देऊन जाईल. 
टोनी कक्कर यांनी सहा ट्रॅक्सना संगीत दिलं आहे. अनमोल आणि झटलेकाशिवाय या सिनेमात निकी वालिया, झोआ मोरानी, प्रवीण दबस, कामिनी खन्ना, अनुराधा पटेल, अशीम गुलाटी आणि परमीत सेठी हे कलाकार असणार आहेत. हा हलका फुलका सिनेमा रिलीज होण्याची चाहते आतुरतेने वाट पहात असतील यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive