By  
on  

Exclusive : ऐश्वर्या शाहरुखच्या सहयोगाने नेटफ्लिक्स वेबसिरीजमधून करणार वेब डेब्यू ?

ऐश्वर्या रायच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी नुकतीच समजली आहे. माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने एक निर्णय घेतला आहे. देशातलं करोना संकट परतल्यानंतर तिने वेबविश्वात पदार्पण करण्याचं ठरवलं आहे. पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्हरित्या मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या तिचा बॉलिवूड को-स्टार शाहरुखच्या रेड चिली एन्टरटेन्मेन्ट बॅनरअंतर्गत नेटफ्लिक्सच्या सिरीजमधून पदार्पण करतेय, तर तिचा पती अभिषेक बच्चन अॅमेझोन प्राईमच्या  'Breathe' सीझन २ मधून आपल्या डेब्यूची तयारी करतोय. कदाचित यामुळेच ऐश्वर्या वेब डेब्यू साठी प्रेरित झाली असेल.

पिपींगमूनला एक्स्क्लयुझिव्ह मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सची ही ओरिजनल वेबसिरीज एक महिला दिग्दर्शिका दिग्दर्शित करत आहे. पण अद्याप त्याचं नाव गुलदस्त्यातच आहे. सर्व गोष्टी फायनल झाल्यावरच ते सांगण्यात येईल. तसंच असंही म्हटलं जात आहे, की ऐश्वर्याने फक्त वर्बली आपला होकार ह्याला कळवला असून तिला यात रस आहे. पण सर्व गोष्टीं फायनल झाल्यावरच ती कॉन्ट्रॅक्ट साईन करेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्याकडे सध्या मणिरत्नम यांचा 'पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा आहे. सिनेमाचा फर्स्ट लुकही उलगडला आहे. लॉकडाऊननंतर या सिनेमाचं शूटींग पुन्हा सुरु होईल. तसंच तिचं आणखी एका सिेनमाबाबत बोलणी सुरु आहेत, परंतु लॉकडाऊनमुळे सर्वच अडलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्या राय बच्चन  ही 90s च्या त्या बॉलीवुड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यात काजोल (त्रिभंगा), माधुरी दीक्षित (द हीरोइन), लारा दत्ता (हंड्रेड), रवीना टंडन, प्रियंका चोप्रा (द व्हाइट टाइगर), विद्या बालन (इंदिरा गांधी बायोपिक) आणि सुष्मिता सेन (आर्या) यांच्यानंतर आपल्या डिजीटल डेब्यूसाठी सज्ज झालीय व लवकरच ती वेबसिरीजमधून आप्लया भेटीस येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive