Exclusive: रणवीर सिंगचा ‘८३’ अडचणीत सापडण्याची शक्यता? काय म्हणतात कबीर खान

By  
on  

भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात आधीच क्रिकेट कमी आहे की काय आता क्रिकेटवर सिनेमाही येणार आहे. दिग्दर्शक कबीर खान १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमचा बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे यात कपिल देवची व्यक्तिरेखा रणवीर सिंग साकारणार आहे. तर इतर व्यक्तिरेखांची निश्चितीही जवळपास होत आली आहे.

१९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या टीमचे कर्णधार होते कपिल देव. याशिवाय या टीमध्ये मोहिंदर अमरनाथ, सुनील गावस्कर, के. श्रीकांत, बलविंदर संधू, सयद किरमाणी, सुनील विल्सन, मदन लाल, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, किर्ती आजाद, यशपाल शर्मा, रवी शास्त्री यांचा समावेश होता. या बायोपिकदरम्यान कबीर खानने या टीमला प्रत्येकी १५ लाख रुपये दिले आहेत पण या मानधनावर कपिल देव खुश नसल्याचं सुत्रांकडून समजलं आहे. या बायोपिकचं कॉन्ट्रॅँक्ट सुनील गावस्कर यांनी अजूनही साईन केलेलं नाही असंही समजलं आहे.

Recommended

Share