अभिनेत्री विद्या बालनने मागील वर्षी 12 डिसेंबर रोजी तिचा आगामी सिनेमा 'शुकंतला देवी'ची प्रदर्शनाची तारीख घोषीत केली होती. आज म्हणजेच 8 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. जर हा सिनेमा आज प्रदर्शित झाला असता तर मागील वर्षी आलेल्या 'मिशन मंगल'नंतरचा विद्याचा हा आगामी बिग स्क्रिन रिलीज सिनेमा असता.' मात्र कोरोना व्हायरसच्या सुळसुळाटाने आणि लॉकडाउमुळे हा सिनेमा प्रदर्शनापासून मुकला. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनूसार विक्रम मल्होत्राच्या अबडानशिया एन्टरटेन्मेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया यांनी ठरवलय की या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी वाट न बघता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणावा. आणि यासाठी हा सिनेमात ते अमॅझॉन प्राईम व्हिडीओवर घेऊन येणार आहेत. लवकरच याविषयीची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. विद्या या सिनेमात गणिततज्ञ शकुंतला देवी यांची भूमिका साकारतेय.
मागील वर्षी विद्याने 12 डिसेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आकड्यांचा एक प्रश्न विचारून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख टीझ केली होती. तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “सगळ्यांना हाय, माझ्याकडे तुमच्यासोबत शेयर करण्यासाठी रोमांचक बातमी आहे. 'शकुंतला देवी'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. आणि हा सिनेमा तब्बल 148 दिवसांनी प्रदर्शित होईल.” पुढे तिने लिहीलं होतं, “ काय झालं ? हिशेब जमत नाही का ? तुम्हाला काय वाटल 'शकुंतला देवी' आहे, असं लगेच कसं सांगेल? चला आणखी एक संधी देते.” नंतर विविध कोडी टाकत विद्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली होती.
पिपींगमूनने 28 एप्रिल रोजी केलेल्या बातमीनुसार मिळालेल्या सुत्रांची माहिती होती की, “सध्या परिस्थितीत मोठ्या स्क्रिनवर प्रदर्शनसाठी अक्षय कुमारचा 'सुर्यवंशी' आणि रणवीर सिंहची '83' फिल्म हे सिनेमे निश्चित झाले आहेत. इतर सिनेमे वेब प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी चर्चा सुरु आहेत.” अनू मेनन यांनी शकुंतला देवी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलय. या सिनेमात जिश्शू सेनगुप्ता, सान्या मल्होत्रा आणि अमित साध यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विद्या बालन या सिनेमासाठी प्रचंड उत्सुक होती ज्याचं चित्रीकरण तिने दोन महिन्यात संपवलं होतं. ज्यांना गणितात असलेल्या मजेत रस नाही त्यांचही मन बदलवण्याऱ्या शकुंतला देवी आहेत. आणि आता हा सिनेमा अमॅझॉन प्राईम व्हिडीओवर कधी येईल याचीच वाट पाहावी लागणार आहे.