Exclusive: सलमान खान आणि राहुल गांधी यांची खास भेट, नक्की चाललंय काय

By  
on  

बॉलिवूड दबंग म्हणजेच सलमान खान कधी काय करेल याचा काही नेम नाही. देशात सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहतायत. सर्व पक्षांनी आपली कंबर कसलीय आणि यात एक चर्चा रंगलीय ती सलमान भाईजानच्या कॉंग्रेस प्रवेशाची. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौ-यावर आहेत. आज मुंबईत आलेल्या राहुल गांधी यांची सलमानसोबत खुपच खास बैठक पार पडली. ह्या बैठकीत ते दोघेच होते. इतर कोणत्याही नेत्याला या बैठकीसाठी परवानगी नव्हती. जवळपास 20 मिनीटं या दोघांचं बोलणं सुरु होतं, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय.

सलमान खान आणि परिवाराचं कॉंग्रेससोबत नेहमीचं जवळचं नातं असल्याचं पाहायला मिळालंय. आत्तापर्यंत कॉंग्रेसच्या अनेक प्रचार रॅलींमध्ये खान कुटुंबियांचा सहभाग पाहायला मिळाला. पण २०१४ च्या निवडणुकांदरम्यान सलमान खानने मोदींसोबत पतंग काय उडवली सर्वांनाच सलमान आणि कॉंग्रेसचं समीकरण उलगडलं नाही. त्यावेळी सलमानने मोदींना खुप सा-या शुभेच्छा दिल्या होत्या. पण आता राहुलसोबत झालेल्या सलमानच्या बैठकीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नक्की कॉंग्रेस आणि सलमानमध्ये शिजतय तरी काय

 

Recommended

Loading...
Share