By  
on  

 Exclusive :  भाषेपेक्षा भावना महत्त्वाची, मला अशी गाणी गायची आहेत, जी माझी ओरिजीनल असतील – माधुरी दीक्षित नेने

जिच्या अदांचे असंख्य चाहते आहेत, तिच्या डान्सच्या ठुमक्यावर ती करोडो चाहत्यांची धक धक वाढवते ती सुपरस्टार, डान्सिंग क्विन माधुरी आता तिच्या आवाजानं मंत्रमुग्ध करतेय. आय फॉर इंडिया या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बहुदा तिचं नृत्यकौशल्याने वेड लावणारी माधुरी चक्क गाणं गाताना दिसली. सोबत मुलगा आरीन पियानो वाजवत होता. आणि परफेक्ट हे प्रसिद्ध इंग्रजी गाणं माधुरी गात होती. यावेळी तिचे असंख्य चाहते तिला पाहतच नव्हते तर कान देऊन ऐकत होते.  त्यातच काही दिवसांत माधुरीने तिचं स्वत:चं सिंगल गाणं घेऊन येत असल्याचं सांगीतलं. काही दिवसांत ‘कँडल’ हे गाणं रिलीज झालं. सध्याच्या लॉकडाउन परिस्थितीवर हे गाणं भाष्य करत आशेचा किरण दाखवतं. आणि पुन्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हे गाणंही माधुरीने इतकं सुंदर गायलं आणि चाहते तिच्या आवाजाच्या प्रेमात पडले. माधुरीने हे गाणं इंग्रजी भाषेत गायलं आहे. पिपींगमूनला नुकत्याच दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत माधुरीने एक महत्त्वाची गोष्ट शेयर केली आहे. माधुरीला आता या नंतर कशा पद्धतीची गाणी गायची आहे याविषयी ती सांगते. 


माधुरी म्हणते की, “भाषेपेक्षा भावना महत्त्वाची आहे. जोपर्यंत लोकांना तुमची भावना समजतेय मग भाषा कोणतीही असो. तुमचा विचार काय आहे, तुमच्या हद्यात काय आहे किंवा तुमच्या मनात काय आहे, अशी गाणी मला गायची आहेत, जी माझी असतील आणि ओरिजीनल असतील. मग मराठी, हिंदी किंवा इंग्रजी ती कोणत्याही भाषेत असो. पण ती माझी ओरिजीनल गाणी असावीत.”
असं म्हणत माधुरीने तिच्या या नव्या इनिंगविषयी सांगीतलं. तेव्हा आगामी काळात माधुरीचं कोणत्याही भाषेतील गाणी येऊ देत, ते तिचं मूळ गाणं असेल आणि त्याचा विचार हा महत्त्वाचा असेल एवढं नक्की.

लॉकडॉउनच्या आधी लॉस एन्जेंलीसमध्ये एका प्रसिद्ध स्टुडिओत माधुरीने हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. त्यानंतर याचं चित्रीकरणं मात्र माधुरीने लॉकडाउनच्या काळात घरीच केलेलं आहे. माधुरीच्या या गाण्याचं तिच्या चाहत्यांसह सिने विश्वातील बड्या कलाकारांनीही कौतुक केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive