Exclusive Audio: मीका सिंहसोबत वाजिद खान यांचं शेवटचं संभाषण, “प्रार्थना करा की तुमचा भाऊ लवकर उभा राहील”

By  
on  

1 जूनच्या मध्यरात्री संगीतकार वाजिद खान यांनी चेंबूरच्या सरना हॉस्पिटरमध्ये शेवटचा श्वास घेतला. मागील दोन महिन्यांपासून वाजिद यांची प्रकृती खराब होती. पिपींगमूनला मीका सिहंसोबतचा वाजिद खान यांच्या संभाषणाचा ऑडियो मिळाला आहे. मीकाने वाजिद यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी त्यांना मेसेज केला होता आणि वाजिद यांनी वॉईस नोट पाठवून मीकाला रिप्लाय केला होता.
 या वॉईस नोटमध्ये वाजिद म्हणतात की, “खूप खूप धन्यवाद मीका भाई तुमचा मेसेज वाचला. खूप बरं वाटलं. आता तुमच्याकडून प्रार्थनेची अपेक्षा आहे. आता प्रकृती बरी होत आहे. अल्लाह ने ठरवलं तर लवकरच बरा होईल, इंशाअल्लाह. ऑपरेशन तर झाला आहे. आता बाकी सगळ्या गोष्टी.. प्रार्थना करा की तुमचा भाऊ पुन्हा सोबत उभा राहील. बस आता प्रार्थनेत आठवण काढा. धन्यवाद. तुमच्या प्रेम, काळजी आणि आधारासाठी. खूप खूप धन्यवाद. बस प्रार्थना करा माझ्यासाठी. खूप धन्यवाद."

पिपींगमून सोबत केलेल्या  बातचीतमध्ये मीका सांगतो की, “अजून कशामुळे झालं हे कन्फर्म नाही. जर कोरोना मुळे झालं असेल तर मी घरातून प्रार्थना करेल. आणि तसं नसेल तर अंत्यसंस्कार मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. लॉकडाउन सुरु झाल्यापासून त्यांना भेटू शकलो नाही. खूप दु:खद गोष्ट आहे ही. भेटायला जाईल, भेटायला जाईल असं म्हणत मनातच राहिलं. खूप मोठा धक्का आहे है इंडस्ट्रीसाठी.
 वाजिद खान आणि मीका सिंह यांनी सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या ‘सुलतान’, ‘रावडी राठौड’ या सिनेमांमधील गाण्यांसाठी एकत्र कामं केली आहेत.
 

Recommended

Loading...
Share