Exclusive:अजय देवगणच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रिलीज होणार ‘दे दे प्यार दे’चा ट्रेलर रिलीज

By  
on  

अजय देवगणचे तारे सध्या चांगलेच तेजीत आहेत. त्याच्याकडे अनेक उत्तमोत्तम सिनेमे आहेत. अलीकडेच  त्याच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमाची घोषणा झाली. याशिवाय अजय ‘तानाजी’ या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय आणखी एका फुटबॉलपटूच्या बायोपिकमध्येही अजय काम करणार आहे.

पीपिंगमूनच्या वृत्तानुसार, अजय देवगणचा २ एप्रिलला ५० वाढदिवस आहे. या विशेष दिवसाचं औचित्य साधून आगामी ‘दे दे प्यार दे’ चा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. एका मोठ्या इव्हेंट्चं आयोजन करून हा दिवस साजरा केला जाणार आहे. हा सिनेमा एक रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा आहे. अंकूर गर्ग या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. याशिवाय भूषण कुमार, लव रंजन, कृष्ण कुमार आणि अंकुर गर्ग हे या सिनेमाचे निर्माते आहे. हा सिनेमा १७ मे ला रिलीज होणार आहे.

Recommended

Share