By  
on  

Exclusive: संजयलीला भन्साळींच्या ‘इन्शाअल्लाह’साठी सलमानने होळीच्यादिवशी दिली लूक टेस्ट

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे. त्यांच्या आगामी इन्शाअल्ला या सिनेमात सलमान काम करणार हे नक्की झालं आहे. आता सलमानसारख्या सुपरस्टारला लूक टेस्टची काय गरज असं तुम्हाला वाटत असेल. पण शिस्तप्रिय भन्साळींनी सलमानलाही लूक टेस्ट द्यायला लावली आहे. सलमानने होळीच्या दिवशी इन्शाअल्लासाठी लूक टेस्ट दिली. मेहबूब स्टुडिओमध्ये ही टेस्ट पार पडली. भन्सळींनी हा सिनेमाच्या कथेसाठी खुप मेहनत घेतली असल्याचं समजतं. त्यामुळे या सिनेमात कोणतीही कमतरता राहू नये असं त्यांना वाटतं. पुढील वर्षी या सिनेमाचं शुटिंग सुरु होणार आहे.

 

विशेष म्हणजे हा सिनेमा ‘बैजू बावरा’ या सिनेमाचा रिमेक असेल असं ही बोललं जात होतं. पण या चर्चेवरही पडदा पडला. याशिवाय या सिनेमात सलमान शाहरुख एकत्र दिसणार अशीही चर्चा होती. पण हे वृत्तही खोटं ठरलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive