By  
on  

 PeepingMoon Exclusive: सुशांत सिंह राजपूतने रिहा चक्रवर्तीला शेवटचा कॉल केला असल्याची माहिती, तो संवाद राहिला अनुत्तरीत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने दु:खी आणि एकटेपणात आज सकाळी केलेली आत्महत्या ही सगळ्यांना चटका लावून जाणारी आहे. असं  बोललं जात आहे की त्याचा शेवटचा कॉल हा अभिनेत्री रिहा चक्रवर्ती केला होता. रिहासोबत सुशांत रिलेशनमध्ये असल्याचं बोललं जात होतं. शिवाय त्याने मित्र महेश शेट्टीला फोन केल्याचही बोललं जात आहे. मात्र हे दोन्ही कॉल अनुत्तरीत राहीले.
पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सुशांत हा बांद्रामधील मॉन्ट ब्लांक डुप्लेक्समध्ये एकटा राहत नव्हता. तर त्याच्यासोबत आणखी चार जणं तिथे होते. ज्यात निरज आणि केशव, दोन बिहारहून आलेले कूक जे त्याच्यासोबत मागील तिन वर्षे होते. शिवाय क्लिनर दिपक सावंत आणमि सिध्दार्थ पिठानी जो आर्ट डिझायनर होता, हे देखील त्याच्यासोबत राहायचे.


सिध्दार्थने दिलेल्या माहितीनुसार सुशांतने त्याच्या बेडरुमचा दरवाजा उघडला नाही, शिवाय त्याने आवाज दिल्यावर प्रतिसादही दिला नाही. तेव्हा 100 वर संपर्क साधून पोलीसांना बोलावण्यात आले होते. त्यानंतर 12 वाजून 22 मिनीटांनी पोलीस तिथे हजर झाले. 12 वाजून 48 मिनीटांनी दरवाजा तोडून उघडण्यात  आला. त्यावेळी सुशांत सिलींगच्या फॅनला हिरव्या रंगाच्या बेडशीटच्या सहाय्याने लटकलेला दिसला. तीन लोकांच्या सहाय्याने त्याला खाली उतरवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. 

Recommended

PeepingMoon Exclusive