By  
on  

PeepingMoon Exclusive : असे होते सुशांतचे शेवटचे ते तास.. रिहाला सुशांतने 1.47 am वाजता केला कॉल, कॉल अनुत्तरीत आणि 12 तासांनी सुशांतचा मृत्यू

सुशांत सिंह राजपूतसाठी कालची रात्र ही नैराश्येत, दु:खात आणि चिंतेत गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  सुशांत त्याच्या नैराश्येवर उपचार घेत होता असही बोललं जात आहे. त्याने रात्री विजे, अभिनेत्री रिहा चक्रवर्तीला 1.47च्या सुमारास कॉल केला होता. रिहासोबत त्याचं रिलेशन असल्याचं बोललं गेलं होतं मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचं रिलेशन खंडित  झाल्याचंही बोललं गेलं. मात्र सुशांतने केलेला कॉल अनुत्तरीत राहीला. त्यानंतर सुशांतने त्याचा मित्र महेश शेट्टीला 1.51 am वाजता कॉल केला. त्याच्याकडूनही सुशांतच्या कॉलला काही प्रतिसाद आला नाही. आणि हे दोन त्याचे मरणापूर्वीचे शेवटचे कॉल ठरले. सुशांतच्या कॉल रेकॉर्डच्या तपासात ही माहिती मिळाली आहे.
सुशांत कधी झोपला याची काहीच माहिती नाही पण सुशांत सवयीप्रमाणे सकाळी 6 वाजता उठला आणि तो डाळींबाचे ज्युस प्यायला. सकाळी 9 ते 11च्या सुमारास सवयीप्रमाणे बिहारी कुक निरज सुशांतला नाश्त्यासाठी  काही हवय हे विचारतो, त्याप्रमाणे निरज या सकाळीही सुशांतच्या बेडरुमकडे गेला आणि त्याने सकाळी 10.21 च्या सुमारास सुशांतच्या बेडरुमचा दरवाजा ठोकला. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. निरजसोबतच केशव नावाचा  आणखी एक बिहारी कुक सुशांतसोबत राहायचा. शिवाय सुशांतचा आर्ट डिझायनर मित्र सिध्दार्थ पिठानी आणि सफाई करणारा दिपक सावंत असे आणखी चार लोकं सुशांतच्या घरात राहायचे.
सिध्दार्थ पिठानी सकाळी 11.21 वाजता उठला आणि त्यानेही सुशांतचा दरवाजा ठोकला. त्यालाही आतून काहीच प्रतिसाद आला नाही मग त्याने सुशांतला बाहेरून फोनही केला. मात्र त्यांना बेडरुममधून फोन वाजण्याचा आवाज येत होता. मग या सगळ्यांनी सकाळी 11.47 वाजता सुशांतची मुंबईत राहणारी बहीण रितूला कॉल केला. रितू येईपर्यंत बांद्र्यामधील मॉन्क ब्लांक अपार्टमेंटच्या केअर टेकरने चावीवाल्याच्या सहाय्याने  बेडरुमचा बंद दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. सुशांतला काहीतरी झालय या भितीने या घरकामगारांनी मग 100 क्रमांकावर फोन लाउन पोलीसांना कळवलं.


त्याचवेळी सुशांतच्या बहिणीचा पती जो हरियाणात आयएएस ऑफिसर आहे, त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना या अपार्टमेंटमध्ये घडलेला प्रकार सांगीतला. मग भितीपोटी यावेळी रुग्णवाहिकाही बोलावण्यात आली. दुपारी 12.22 च्या सुमारास पोलीस मॉन्ट ब्लँकमध्ये पोहोचले. आणि 12.48 वाजता त्यांनी बेडरुमचा दरवाजा तोडला  आणि ते आत शिरले. यावेळी आत शिरताच सुशांत हा रुमच्या सिलींग पंख्याला गुंडाळलेल्या हिरव्या बेडशीटने फांस लावलेला आढळला. त्याच्या वजनाने पंखा वाकला होता आणि सुशांतचे पाय बेडवर लटकत होते. जवळपास तीन लोकांनी मिळून सुशांतच्या शरीराला खाली उतरवलं. तिथे उपस्थित डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

 

Recommended

PeepingMoon Exclusive