अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे अंत्यसंस्कार पटनाला होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. सुशांतच्या दोन बहिणी रितू आणि मितू यांची इच्छा होती की त्याचे अंत्यसंस्कार पटनामध्ये करण्यात यावे. मात्र मुंबई पोलीसांनी सुशांतचं पार्थिव मुंबईहून पटनाला नेण्यासाठी सिंह परिवाराला परवानगी नाकारली आहे. पटनाला सुशांतचे बाबा के के सिंह सध्या त्याच्या निधनाच्या बातमीने त्रासात आहेत.
बॉलिवुडच्या या उत्तम अभिनेत्याने आज सकाळी त्याच्या मुंबईतील कार्टर रोड येथील राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर त्याचं पार्थिव रात्रभर कूपर हॉस्पिटलमध्येच राहील. सध्या तिथे पोस्टमार्टमसाठी कोणतेही डॉक्टर उपस्थित नसल्याचं कळतय.
पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार सध्याच्या कोव्हिड-19च्या तणावग्रस्त परिस्थितीत, पोस्टमार्टम आणि अंतिम संस्कार किंवा दफनविधीसाठी खूप काळ लागत आहे. यात सरकारी रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत असल्याचं लक्षात येत आहे. आणि या तुटवड्याने सुशांतच्या पोस्टमार्टमवरही परिणाम झाला आहे.