By  
on  

 PeepingMoon Exclusive : हरियाणाचे पोलीस असलेले सुशांतचे मेहुणे येणार मुंबईत, परिवाराची चौकशीची मागणी

कोणतीही पर्वा न करता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास हा बांद्रा पोलीसांकडून आता क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित केला आहे.
पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची मोठी बहीण रितू जिचे पती हे ओमप्रकाश सिंह हरियाणामधील आय पी एस ऑफीसर आहेत. त्यांना संशय आल्याने सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणावर कडक तपास करण्याची मागणी बहीणीने केली आहे.

रितूने हे स्पष्ट केलं आहे की तिला जाणून घ्यायचं आहे की कुणी आणि कशामुळे तो इतका नैराश्येत आला ज्याने त्याने आत्महत्या केली. आणि या चौकशीत मुंबई पोलींसावर तणाव येऊ नये असं तिला वाटतय.
आणि यात आणखी एक ट्विस्ट आहे. सुशांतचे मेहुणे ओम प्रकाश सिंह जे हरियाणामधील अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे स्पेशल ड्युटी ऑफिसर आहेत. ते आता चंदीगढ येथून मुंबईत येणार आहेत. आणि ते मुंबईत पोहचे पर्यंत त्यांना सुशांतचं पोस्टमॉर्टम थांबवायचं आहे.
 
 

Recommended

PeepingMoon Exclusive