By  
on  

PeepingMoon Exclusive : सुशांत सिंह राजपूतने महेश शेट्टीला केलेला कॉल अनुत्तरीत , त्या कॉलने कदाचित पडला असता फरक..

टिव्ही कलाकार महेश शेट्टी जो सुशांत सिंह राजपूतचा मित्र आहे तो आजचा दिवस कधीच विसरणार नाही. महेशला सुशांतच्या नैराश्येविषयीची माहिती होती, आणि म्हणूनच सध्याच्या कोव्हिड-19च्या लॉकडाउन परिस्थितीत तो सुशांतला दररोज सकाळी कॉल करून सुशांतची विचारपूस करत असे. मात्र आजचा दिवस वेगळा होता. महेश ही शेवटची व्यक्ती होती ज्याला सुशांतने रात्री 1 वाजून 51 मिनीटांनी शेवटचा कॉल केला होता. महेशकडून कॉल उचलला न गेल्याने सुशांत झोपून गेला. जेव्हा महेश सकाळी उठला आणि त्याने सुशांतचा कॉल पाहिला तेव्हा त्याने सुशांतला लगेचच सकाळी 8 वाजून 30 मिनीटांनी कॉल केला. पण सुशांत तेव्हा झोपलेला होता. पण त्यानंतर सुशांतशी नंतर बोलू हा विचार महेशने केला.  
सुशांतच्या आत्महत्येची बातमी येताच महेशला नंतर माहिती झालं की सुशांतच्या आत्महत्येविषयी त्याला सांगीतलं जाईल. पण महेशला फक्त हाच धक्का नव्हता तर जेव्हा तो बांद्रा पोलीसात त्याचं स्टेटमेंट नोंदवायला गेला तेव्हा आणखी एक बातमी त्याच्या समोर आली. त्याला कळालं की सुशांतच्या कॉल रेकॉर्ड्सच्या तपासात सुशांतने सकाळी उठून 9 वाजून 30 मिनीटांनी महेशला परत कॉल केला होता. पण कॉल लागलाच नव्हता. पोलीसांनी महेशला सांगीतलं की, सुशांतचा महेशला केलेला कॉल हा सकाळी 9 वाजून 30 मिनीटांनी रेजीस्टर्ड आहे. पण महेशला तो फोन आल्याचा कोणताच रेकॉर्ड त्यात नाही. कारण तो कॉल लागलाच नाही. आणि ही गोष्ट महेशच्या कायम मनात राहील. महेश याच विचारात असेल की जर तो कॉल लागला असता आणि हे दोन मित्र बोलले असते तर सुशांतने कदाचीत आत्महत्या केली नसती. सुत्रांच्या माहितीनुसार महेश हा सुशांतच्या या कठीण समयी मोठा भावनिक आधार होता.


 
 महेशला सुशांत हा कधीही रात्री अपरात्री 2 वाजता कॉल करत असे, तो त्याच्याशी गोष्टी शेयर करत असे, अशी त्यांची मैत्री होती. महेशला सुशांतच्या आत्महत्येविषयी कल्पना नव्हती पण तो सुशांतला जेव्हा गरज असायची तेव्हा नेहमीच हजर असायचा. पण या सकाळी नशीबाने या मित्रांना बोलू दिलं नाही आणि सुशांतने हे टोकाचं पाऊल उचललं. कदाचीत त्या एका कॉलने सुशांतने त्याचा निर्णय बदलला असता असं कायम महेशलाही वाटत राहील.   

 

Recommended

PeepingMoon Exclusive