By  
on  

PeepingMoon Exclusive: सुशांत सिंह राजपूतचे पार्थिव त्याचे मेहुणे आणि हरियाणाचे प्रसिध्द पोलीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे मेहुणे ओम प्रकाश सिंह जे हरियाणाचे आयपीएस पोलीस अतिरिक्त महासंचालक आहेत, त्यांना मुंबई पोलीस आज सुशांतचं पार्थिव सुपूर्त करतील. ते सुशांतची बहीण रितूचे पती आहेत. आणि ते काल रात्रीच चंदीगढहून मुंबईत आले आहेत.

    मुंबई पोलीसांनी सुशांतच्या परिवाराला अंत्यसंस्कारासाठी बांद्रा आणि विले पार्ले हे दोन पर्याय दिले होते. सुशांतच्या परिवाराने अंत्यसंस्कारासाठी विले पार्लेमधील पवन हंस स्मशानभूमी निवडली आहे. आणि ओ पी सिंह यांनी सुशांतचं पार्थिव मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्याही केल्या आहे. महत्त्वाच्या कागदप्रत्राचे अटेस्टेशन आणि इतर गोष्टी करत नियमांप्रमाणे हे पार पडेल.  अंत्यसंस्कार हे आज संध्याकाळी 5 वाजता परिवारातील फक्त 8 लोकांच्या उपस्थितीत पार पडेल. 

Recommended

PeepingMoon Exclusive