बूॉलिवूडची क्वीन म्हणजे अभिनेत्री कंगना रानौत. 'मणकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' या ऐतिहासिक बायोपिकनंतर कंगनाच्या पदरात आणखी एक बायोपिक पडला आहे. लवकरच ती याची अधिकृत घोषणा करणार असली तरी पिपींगमूनला याबबातची सर्व एक्सक्ल्युझिव्ह माहिती मिळाली आहे.
पिपींगमूनच्या एक्सक्ल्युझिव्ह माहितीनुसार तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा ' पूरुच्ची थलाईवी' हा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. अभिनेत्री ते मुख्यमंत्री आणि तामिळनाडूच्या सर्वसामान्य जनतेची अम्मा साकारण्याची संधी आता कंगनाला मिळतेय. तिच्या नावावर ह्या भूमिकेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन, विद्या बालन यांच्यासह कंगनांचं या सिनेमासाठी नाव चर्चेत होतं, पण अखेर दोघींना मागे टाकत कंगनाने ही भूमिका मिळवली.
जयललिता यांचा हा जीवनपट तामिळ दिग्दर्शक ए.एल विजय दिग्दर्शित करणार असून बाहुबली आणि मणकर्णिकाची कथा लिहणारे विजयेंद्र प्रसादच याच्या कथेची जबाबदारी सांभाळतील. जवळपास 100 कोटी बिग बजेट असलेला हा सिनेमा यंदा जुलैपासून फ्लओ्रवर जाणार असून पुढील वर्षी 2020 साली तो प्रेक्षकांच्या भेटीस येईल. महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा तमिळ, तेलुगू आणि हिंदीत प्रदर्शित होणार ाहे.