Exclusive: शाहरुख खान ऑक्टोबरमध्ये सुरु करणार राजकुमार हिरानींच्या प्रोजेक्टला सुरुवात

By  
on  

लॉकडाऊननंतर राजू हिरानींचा हलका-फुलका सिनेमा फ्लोअरवर जाण्यासाठी तयार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात बादशहा शाहरुख खान दिसणार आहे. मार्चमध्ये या सिनेमात शाहरुख दिसू शकतो हे पीपिंगमूनने सांगितलं होतंच. शाहरुखने त्याच्या फ्लॉप झालेल्या झिरोनंतर कोणताही प्रोजेक्ट साईन केला नव्हता. त्याने या शुटिंगचं शेड्युल मात्र हिरानींना ऑक्टोबरनंतर सुरु करायला सांगितलं आहे. या सिनेमाला होकार कळवण्यापुर्वी शाहरुखने जवळपास 20 स्क्रिप्ट वाचल्या होत्या. 

या सिनेमाच्या शुटिंगला मेमध्ये सुरुवात होणार होती. पण लॉकडाऊनमुळे हा प्लॅन पुढे गेला आहे. याकाळात त्याने पोस्ट प्रॉडक्शनचं काम शक्य तितक्या लवकर उरकून घेण्यास सांगितलं. याशिवाय दिग्दर्शकांनाही पटकथाही उत्तम असावी याची काळजी घेतली. सध्य तरी शाहरुख या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय राज आणि डीके, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या सिनेमांबाबत अजून केवळ चर्चाच सुरु आहे. शाहरुखने या निर्मात्यांना स्थिती सामान्य होण्याची वाट पाहण्यास सांगितलं आहे.

Recommended

Loading...
Share