Exclusive: नेटफ्लिक्सच्या डार्क कॉमेडी सिरीजमध्ये विजय राज साकारणार गॉडमॅन

By  
on  

अलीकडेच ‘गुलाबो सिताबो’ मध्ये एका सरकारी अधिका-याच्या भूमिकेत झळकलेले अभिनेते विजय राज आता डिजीटल डेब्युसाठी तयार आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार विजय राज दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन नेटफ्लिक्स सोबत एक डार्क कॉमेडी सिरीज करत आहेत. 

यात आधुनिक आध्यात्मिक गुरुसाठी विजय यांचं नाव चर्चेत आहे. भारतात ढोंगी आध्यात्मिक बाबांचं वाढत असलेलं प्रस्थ आणि त्यात गुरफटलेले अंध भक्त यावर बेतली आहे. हा शो सत्यजीत रे यांचा बंगाली सिनेमा ‘महापुरुष’ वर बेतली आहे. यात एका कुटुंबाची गोष्ट आहे जे एका आध्यात्मिक बाबामुळे उध्वस्त होतात.  मेनन यांच्यासोबत विजय यांची ही दुसरी सिरीज आहे. पहिल्यांदा 2009मध्ये ‘बारह आना’ या विनोदी सिरीजमध्ये दोघांनी काम केलं होतं.

Recommended

Loading...
Share