By  
on  

PeepingMoon Exclusive : फॉरेन्सिक तज्ञ तपासत आहेत सुशांत सिंह राजपूतने आत्महत्येसाठी वापरलेला कपडा

 कूपर हॉस्पिटलने काल सुशांत सिंह राजपूतचा शव परिक्षण अहवाल हा बांद्रा पोलिसांकडे दिला, जे सुशांतच्या 14 जून रोजी झालेल्या आत्महत्ये विषयीचा तपास करत आहेत. ज्यात सुशांतचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष आहे.य़ातून सुशांतने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तरीही सुशांतने इतकं मोठं पाऊल का उचललं याचा सुगावा पोलीसांना लागत नाहीय.  

पिपींगमूनला मिळालेल्या माहितूनसार कलीना फॉरेन्सिंक प्रयोगशाळा तज्ञांनी पोलीसांना सुशांतच्या मृत्यच्या केसमध्ये आणखी थिएरिजच्या माध्यमातून तपास करण्याचा आग्रह केला आहे. सुशांतच्या बेडरुममध्ये ज्या कपड्याने त्याने गळफास घेतला होता त्याच्या ताणसंबंधीची शक्ती ते तपासून पाहत आहेत. सुशांतएवढ्या वजनाची व्यक्ती त्या कपड्याने आत्महत्या करू शकते की नाही यावरही तज्ञ प्रयोग करत आहेत. 
सुशांतच्या या आत्महत्येच्या केसमध्ये ज्यात आधीच आत्महत्या केल्याचं निश्चित झालय त्यात हे एक अनपेक्षित वळण आहे. शिवाय ही फॉरेन्सिक प्रयोगशाळा हेही तपासून पाहतेय की, जेव्हा सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याने ड्रग्ज किंवा दारूचं सेवन केलं होतं की नाही ते. शिवाय विष चिकित्सा तज्ञांची स्पेशल टीम सुशांतच्या शरीरातील आतील भाग आणि महत्त्वपूर्ण अवयवांचं काही रासायनिक विश्लेषणही करत आहेत, जेणेकरून या तपासात काही निष्कर्ष येईल. यासाठी त्यांना आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल त्यानंतर ते पोलीसांना रिपोर्ट देतील.   

Author

Recommended

PeepingMoon Exclusive