PeepingMoon Exclusive: ‘लुडो’ ते ‘झुंड’, टी सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करणार त्यांच्या या छोट्या बजेट फिल्म्स

By  
on  

कोरोना व्हायरसच्या पार्श्वाभूमिवर बॉलिवुड फिल्ममेकर्सना त्यांचा रस्ता हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर सापडला आहे. सिनेमागृहे कधी सुरु होतील याविषयीची कोणतीच माहिती अद्याप समोर नसताना काही निर्मात्यांनी आणि स्टुडिओज मिळून त्यांचे सिनेमे बॉक्सऑफिसवर रिलीज होण्याची वाट न पाहाता ऑनलाईन प्रदर्शित करत आहेत. निर्माते Abundantia Entertainment चे विक्रम मल्होत्रा यांनी विद्या बालनची ‘शकुंतला देवी’ बायोपीक आधीच अमेझॉन प्राईम व्हिडीओला विकली आहे. शिवाय Panorama Studio's चे कुमार मंगत पाठक यांनीही त्यांच्या 2020 मधील ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’, ‘द बिग बुल’, आणि ‘खुदा हाफिज’सह इतर प्रोजेक्ट ओटीटीवर प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. हे सिनेमे ते डिझ्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करणार आहेत.  
या नव्या ट्रेंडमध्ये आता भूषण कुमार देखील सहभागी झाले आहेत. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार टी-सीरीजने त्यांच्या काही छोट्या बजेटच्या फिल्म्स या नेटफ्लिक्सवर डिडीटली प्रदर्शित करण्याचं ठरवलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हा करार झाला असून कायदेशीर पेपरवर्क झाल्यावर लवकरच याविषयीची घोषणा करण्यात येईल. नेटफ्लिक्सच्या प्रमियरसाठी ‘लुडो’, ‘झुंड’ आणि ‘इंदू की जवानी’ या सिनेमांची निवड करण्यात आली आहे. जे सिनेमे तयार असून याच वर्षी प्रदर्शित होणार होते.
टी-सीरीज सध्या जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मिच्या ‘मुंबई सागा’, परिणीती चोप्राची सायना नेहवाल बायोपीक या सिनेमांविषयीही बोलणी करत आहेत. पण याविषयीचा करार होऊ शकलेला नाही. अद्याप या सिनेमांचं फिनीशिंग शूट बाकी आहे आणि हे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करायचे की सिनेमागृहात यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. टी-सीरीजचं जॉईंट प्रोडक्शन वेन्चर ‘ट्युझडे एन्ड फ्रायडेज’ आणि एझ्रा रिमेक हे देखील ओटीटीवर येण्याची शक्यता आहे.  


हे सिनेमे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत :

लुडो : हा एक डार्क कॉमेडीचा साहित्यसंग्रह असून ज्यात चार कथा आहे त्या विचित्र भारतिय मेट्रोवर आधारित आहेत. अनुराग बासूच्या लुडोमध्ये अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि पंकज त्रिपाठी अशी स्टारकास्ट आहे. ही एक एक्शन कॉमेडी असून इंटरेस्टिंग कहाणी यात आहे. ड्रामा आणि भावनांनी भरलेल्या कहाणी ज्याला प्रितमचं सुरेल कम्पोझिशन लाभलं आहे.

 

 

इंदू की जवानी – कियारा अडवानी आणि आदित्य सिल झळकत असलेला हा सिनेमा गाझियाबादमधील एका नाजूक चिडखोर मुलिच्या आयुष्यात आलेल्या डेटिंग ऐपचा झालेल्या परिणामावर आधारित आहे. निखिल अडवानी, निरंजन अयंगर आणि रायन स्टेफन हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा एका प्युअर हार्टेड ड्रामा असून बंगाली लेखक-दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता यांचं हिंदी दिग्दर्शनातील पदार्पण आहे.

 

झुंड – सैराट फेम मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे या बॉलिवुड डेब्यू असलेला सिनेमा हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. ज्याला झोपडपट्टी भागाची पार्श्वभूमि आहे. यात बिग बी अमिताभ बच्चन हे विजय बरसेच्या भूमिकेत आहेत. जे रस्त्यांवरील मुलांचं लक्ष ड्रग्ज आणि गुन्हेगारीपासून फुटबॉलकडे वळवतात. या सिनेमात सैराट फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतील.

 

 हंसल मेहता यांच्या 'छलांग' या सिनेमाचीही यासाठी बोलणी सुरु असल्याचं कळतय.  

Recommended

Loading...
Share