अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणातील चौकशीचे ढग आणखी गडद होताना दिसत आहेत. बांद्रा पोलिसांनी या प्रकरणी आणखी सेलिब्रिटींची चौकशी करण्याचं ठरवलं आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधील आणखी एक प्रथितयश नाव चौकशीच्या फे-यात अडकलं आहे. हे नाव आहे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. 2013 साली रिलीज झालेल्या ‘रामलीला’ या सिनेमात रणवीरसिंगने सुशांत सिंग राजपुतला का रिप्लेस केलं याची चौकशी संजय यांच्याकडे पोलिस करणार आहेत.
सुशांतने अचानक यशराज फिल्म्स सोडलं. पण त्यामुळे त्याचा रामलीला मधून रिप्लेस केलं गेलं का याची चौकशीही पोलीस करणार आहेत. संजय यांच्याशिवाय इतर मोठी नावंही चौकशीच्या कक्षेत येणार आहेत. यासोबतच पोलिसांनी कंगना राणावत आणि दिग्दर्शक शेखर कपुर यांनाही चौकशीला बोलावलं आहे. कंगना आणि शेखर यांना चौकशीला बोलावण्याचं कारण म्हणजे या दोघांनीही सुशांतची बाजू उचलून धरत त्याला एकटं पाडल्याचा आरोप केला होता. यशराजची कास्टींग एजंट शानू शर्मा हिनेही रणवीर आणि सुशांत या दोघांनाही दुस-या राऊंडच्या चर्चेसाठी बोलावलं होतं हे पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.